तुमच्या आवडीचा नाष्टा कोणता असं जर कुणाला विचारलं तर १० पैकी ७ जण तरी कांदापोहे असच उत्तर देतील. घरी पोहे करून त्यावार मस्तपैकी ओलं खोबर, कोथिंबीर आणि लिंबू पिळून खाण्यात मजा आहेच पण समजा एखाद्या शनिवारी किंवा रविवारी तुम्हाला पोहे खायची ईच्छा झाली तर गाडी काढून खालील ठिकाणी जाऊन पोहे खायचा आनंद तुम्ही घेऊ शकता. माझ्या माहितीतील या ठिकाणांची माहिती मी देत आहे याशिवाय अजूनही काही ठिकाणी पोहे छान मिळू शकतात पण सुरुवात या ठिकाणांपासून करायला हरकत नाही.