Best Poha in Pune
0
best poha in pune

तुमच्या आवडीचा नाष्टा कोणता असं जर कुणाला विचारलं तर १० पैकी ७ जण तरी कांदापोहे असच उत्तर देतील. घरी पोहे करून त्यावार मस्तपैकी ओलं खोबर, कोथिंबीर आणि लिंबू पिळून खाण्यात मजा आहेच पण समजा एखाद्या शनिवारी किंवा रविवारी तुम्हाला पोहे खायची ईच्छा  झाली तर गाडी काढून खालील ठिकाणी जाऊन पोहे खायचा आनंद तुम्ही घेऊ शकता. माझ्या माहितीतील या ठिकाणांची माहिती मी देत आहे याशिवाय अजूनही काही ठिकाणी पोहे छान मिळू शकतात पण सुरुवात या ठिकाणांपासून करायला हरकत नाही.

सुशील पोहे आणि मिसळ

दांडेकरपुलाच्या बाजूने लालबह्हादूरशास्त्रीरोडला लागल्याच्यानंतर  सिग्नलच्या पुढे “सुशील पोहे आणि आत्याची झटका मिसळ” हा बोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. ईथे गरम गरम पोहे मिळतात. मिरच्या थोड्या जास्त असतात पण टेस्टी पोहे खायचे असतील तर सुशील पोहेला तोड नाही. मिरच्या अलगद बाजूला सारून पोहे खात असताना दोन प्लेट कश्या फस्त होतात तेच कळत नाही. ते पोहे घरून बनवून आणतात आणि शॉप मध्ये प्लेट मध्ये देतात. एक माणूस कायम घरून पोहे आणायला आणि रिकामा डबा परत न्यायला ठेवलेला आहे. तशी इथे नेहमीच गर्दी पण शनिवार-रविवार असेल तर मात्र १०-१५ मिनटे लाईन मध्ये उभं रहायची तयारी ठेवा. पण पोहे खाल्ल्यावर ती १५ मिनटे सार्थकी लागली असं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही.

आम्ही पोहेकर

या ठिकाणी तुम्हाला पोहे सोडून काहीच मिळणार नाही. पोह्यांच्या १५ हुन अधिक प्रकारच्या उत्तम व्हरायटी मिळतील. नक्की कोणते पोहे ऑर्डर करायचे असा प्रश्न तुम्हांला नक्कीच पडेल. घरचे पोहे, कोकणी पोहे, पोहे भेळ, दही पोहे अश्या वेगवेगळ्या चवीचे पोहे तुम्हाला ट्राय करायला मिळतील. आवर्जून भेट द्यावी असं ठिकाण.

अमृतेश्वर भुवन

समजा तुम्हाला सकाळी ५ वाजता पोहे खायची ईच्छा  झाली तर तुम्हाला नळ स्टॉपला यावं लागेल. तिथे आल्यावर तुम्हाला शोधायची गरज लागणार नाही असलेली गर्दी तुम्हाला दुकान दाखवेल. पोह्यांसोबत चटणी किंवा सांबर आवडत असेल तर तेही मिळेल. त्यांचं दुकान सकाळी ३ वाजता सुरु होत. पोहे खाल्ल्यावर चहा घेणार नसाल तर काय मजा?

बिपीन स्नॅक्स

गरवारे कॉलजेच्या समोरच असलेलं हे दुकान पोह्यांसोबत साबुदाणा खिचडी आणि काकडीच्या कोशिंबिरीसाठी प्रसिद्ध आहे. बऱ्याच वर्षांपासून सेवा देत असलेलं बिपीन स्नॅक्स आपली चव अजून टिकवून आहॆ. वर्दळीच्या रस्त्याला असल्यामुळे पार्किंगला जागा नाही पण तिथले काही पदार्थ तुमच्या मनात नक्की जागा करतील.

एकदा तरी जाऊन कांदापोहे ट्राय करावीत अशी ही ठिकाणे तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा!

Leave a Comment